Sanskar Sansthan Etapalli

लालसू तुमरेटी, जो एकेकाळी संस्कार संस्थेद्वारे शैक्षणिक दत्तक झाला होता, आज शेती व्यवसायात उल्लेखनीय प्रगती करत आहे. त्याच्या प्रवासाची सुरुवात एका साध्या खेड्यातून झाली, जिथे शिक्षणाची साधने खूपच मर्यादित होती. संस्कार संस्थेच्या मदतीने लालसूने आपले शिक्षण पूर्ण केले आणि आधुनिक तंत्रज्ञान व कृषी तंत्रज्ञानाविषयी सखोल ज्ञान मिळवले. शिक्षणाच्या आधारावर, तसेच संस्कारचा विध्यार्थी गोसू हिचामी याच्या मदतीने लालसूने शेतीकडे नवी दृष्टीकोनाने पाहायला सुरुवात केली. पारंपरिक पद्धतींबरोबरच त्याने सेंद्रिय शेती, सिंचन, पीक चक्र व्यवस्थापन आणि आधुनिक कृषी उपकरणांचा वापर सुरू केला. सुरुवातीला लहानशा जमिनीवर काम करणाऱ्या लालसूने आता त्याचा शेत व्यवसाय विस्तारून विविध पिकांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय, तो इतर शेतकऱ्यांना सुद्धा सल्ला देतो आणि त्यांना आधुनिक शेती पद्धतींबद्दल मार्गदर्शन करतो. त्याच्या मेहनतीमुळे आणि तंत्रज्ञानाच्या योग्य वापरामुळे त्याला चांगले उत्पादन मिळाले, ज्यामुळे त्याच्या आर्थिक परिस्थितीतही खूप सुधारणा झाली आहे.लालसूचे यश फक्त त्याच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी ठरले आहे. तो दाखवून देतो की शिक्षण व सातत्यपूर्ण प्रयत्नांनी कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते.

मनेश लेकामी हा अतिदुर्गम अशा जाजावंडी गावाचे रहिवासी आहे. या भागात शिक्षण घेणे, शहराशी संपर्क ठेवणे हीच एक मोठी कसरत असते. अशा पार्श्वभूमीतून आलेल्या मनेश याने संस्कार संस्था यांच्या आधाराने आपला जीवनप्रवास बदलून दाखवला आहे. त्याने संस्कार वसतिगृहात राहून शिक्षण घेतले, आणि “Earn and Learn” योजनेअंतर्गत काम करत स्वतःचा खर्च भागवत, स्वाभिमानाने शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असताना त्याने संगणकाचे विविध कौशल्य आत्मसात केले आणि सोबतच वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेऊन ड्रायव्हिंगचा परवाना मिळवला. संस्कार संस्थेद्वारा सुरू असलेल्या प्राणरक्षा या रुग्णवाहिका सेवेत त्याने हातभार लावला. वेळोवेळी रूग्णांना संस्थेद्वारा मदत पुरविण्यात हातभार लावला. आपल्या मेहनती आणि चिकाटीच्या जोरावर मनेश याने पदवी (Graduation) पूर्ण केली असून सध्या पदव्युत्तर शिक्षण (Post-Graduation) करत आहे. त्याचसोबत तो पोलीस स्टेशनमध्ये संगणक आधारित ऑपरेटर म्हणून काम करत नोकरी संदर्भ तयारीही करीत आहे. याकरिता आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व आत्मनिर्भर बनला आहे. संस्कार संस्थेच्या मदतीनेच मनेश यांच्यासारख्या अनेक मुलांना आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणता आलेला आहे. मनेश यांचा प्रवास म्हणजे जिद्द, प्रयत्न, आणि योग्य संधी मिळाल्यास कोणताही युवक यशस्वी होऊ शकतो याचे उदाहरण आहे.

सर मला शिकायचंय ,मला संस्कार मध्ये येऊ द्याल का? एक निरागस आणि जिज्ञासूं मुलगा माझ्या समोर होता, गोसू, आपला सर्वात मोठा (पहिला) दत्तक विद्यार्थी, दुर्गम व नक्षलग्रस्त अश्या जारावंडी भागातील ताडगूडा गावातील हा मुलगा. त्याची शिकण्याची धडपड खुप होती. त्यामुळे त्याच्या पाठीशी खंबीरपणे संस्कार परिवार राहिले, आणि राहणार हे आम्ही त्याला आवर्जून सांगायचे. खरेतर या लेकराच्या जिद्दीपुढे ही मदत खुप छोटी राहिली. प्रामाणिकपणे अभ्यास आणि शिकून इतरांना मदत करण्याचे ध्येय घेऊन निघालेला हा विध्यार्थी संस्कार मध्ये सर्व शिकत राहिला. संस्कार मध्ये त्यावेळी सुविधांचा अभाव होताच, अक्षरशः आम्हा सर्वांना अभावाने त्रस्त केलेलं होत. या सर्वाचा तो साक्षी राहिला, व प्रगती करीत राहिला. पुढे 10 वी मध्ये तो तालुक्यातून प्रथम होता. त्याचा सत्कार झाला. 12 मध्येही टॉप राहिला. BSC AGRI. केली , आता तालुका कृषी कार्यालय एटापल्ली येथे कृषिसेवक म्हणून नौकरीला आहे, ही नौकरी त्याने जॉईन केली, त्यातून दुर्गम भागातील आदिवासी बांधवांकरिता सेवा करत आहे. आदिवासी तथा इतर शेतकऱ्यांना शासनाचे लाभ मिळवून देत आहे. 3 वर्षाच्या सेवक कालावधीनंतर तो.

Sushma and Pratiksha Pudo from remote village Gattepalli,they were school dropped students… they learnt in Free classes of Sanskar years back as KGBV school .. Now they are working in Clothes Project of Loyad metals Ltd..

एटापल्ली तालुक्यातील कोसा आळेंगा या अतिशय दुर्गम भागातील विद्यार्थी नांगसु पोटावी याचे संस्कार मध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले पुढे त्याच्या आवडीच्या BPE चे शिक्षण नागपुरात करण्यात आले. संस्थेच्या काही शुभचिंतकांच्या मुळे शासनाच्या मेरी माटी मेरा देश या सदरात चि. नांगसु ला मुंबई येथे माननिय मुख्यमंत्री व दिल्ली येथे माननिय पंतप्रधान यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात तालुक्यातून कलश नेण्याचा मान आणि जबाबदारी मिळालेली आहे. नांगसु सध्या संस्कार मध्ये Earn n Learn मध्ये प्रशिक्षण घेत शिक्षण घेत आहे व सेवा कार्यात मदतही करत आहे

संस्कारच्या विध्यार्थ्यांची नवोदय विद्यालयात निवड.

पुन्हा एक यशस्वी सदस्य : आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या संस्कार परिवारातील उमेश यंदाच्या पोलीस भरतीमध्ये यशस्वी होऊन नौकरीला लागला. अत्यंत गरीब आणि दुर्गम भागातील (जिथे पावसाळ्यात जायला पूल नाही ) लोक बांबू आणि लाकडाच्या तुटपुंज्या नावेने नदी ओलांडतात अश्या खेड्यातून येऊन शिक्षण घेऊन त्याने हे यश मिळवले आहे. उमेश लहान वयात असताना संस्कार मध्ये राहण्यास आलेला होता. संस्कार मध्ये शिक्षण घेत त्याने सुसंस्कार शिबीर सहभागी झाला, ध्यान-प्रार्थना, नियमित करी. शिकत असताना ड्रायविंग शिकून आपल्या संस्थेद्वारा रुग्णवाहिकेला सेवा दिली. पुढे त्याने 12 वि नंतर नागपूर व पोलीस तयारी साठी गडचिरोली ला राहून मेहनत घेतली आणि यशस्वी झाला.
जयगुरुदेव राष्ट्राय स्वाहा ईदम न मम् (उमेश 9421682909)

यशोगाथा: राकेश मादी मडावी – दुर्गम भागातून यशस्वी प्रवास. राकेश मादी मडावी हा बोटांफुंडी या अतिदुर्गम गावातील होतकरू विद्यार्थी. आदिवासी भागातील प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची ओढ आणि जिद्द त्याच्या डोळ्यांत होती. वीज, रस्ते, इंटरनेटसारख्या मूलभूत सुविधा नसलेल्या गावातून त्याने शिक्षणाची वाट निवडली. एटापल्ली येथे शिक्षण घेण्यासाठी तो घरापासून दूर गेला. संस्कार संस्थेत इयत्ता 10 वी पासून त्याने आपले शालेय शिक्षण सुरू केले. तिथे त्याने मेहनत, प्रामाणिकपणा आणि सातत्य याच्या जोरावर स्वतःला सिद्ध केलं. आर्थिक अडचणी असूनही त्याने हार मानली नाही. शालेय शिक्षणानंतर राकेशने पदवी शिक्षणासाठीही प्रयत्न सुरू ठेवले आणि अखेर त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केले. या प्रवासात त्याने अनेक अडचणींवर मात केली – अभ्यासासाठी उशीरापर्यंत जागरण, आर्थिक अडचणी, आणि कधी कधी उपासमार. पण त्याची चिकाटी त्याला पुढे नेत राहिली. आता त्याच राकेश मडावीने त्रिवेणी कंपनी मध्ये नोकरी मिळवली आहे. गावातील इतर तरुणांसाठी तो एक प्रेरणास्थान ठरला आहे. बोटांफुंडी सारख्या दुर्गम भागातून आलेल्या एका तरुणाने मेहनतीच्या जोरावर स्वतःचं भविष्य घडवलं. आज तो फक्त आपल्या कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण गावाचा अभिमान बनला आहे. राकेशची यशोगाथा ही दाखवते की योग्य दिशा, मार्गदर्शन, आणि अपार मेहनत याच्या जोरावर कोणतीही अडचण ही यशाच्या मार्गात अडसर ठरू शकत नाही.

Need Help?